च्यांग्सू (देवनागरी लेखनभेद : ज्यांग्सू; सोपी चिनी लिपी: 江苏 ; पारंपरिक चिनी लिपी: 江蘇 ; फीनयीन: Jiāngsū ;) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेला षांतोंग, पश्चिमेला आंह्वी, दक्षिणेस चच्यांग व शांघाय या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस पिवळा समुद्र पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून यांगत्झे नदी वाहते. शांघाय, पैचिंग, थ्यांचिन या प्रांततुल्य महानगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. नानचिंग येथे च्यांग्सूची राजधानी असून सूचौ हे येथील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. शुचौ, वुशी ही देखील ह्या प्रांतामधील प्रमुख शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →च्यांग्सू
यामागील विज्ञान आणि इतिहास.