च्यामेन (चिनी: 厦门市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील फूच्यान या प्रांतातले एक मोठे शहर आहे. च्यामेन शहर चीनच्या आग्नेय भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. च्यामनेला तैवानची सामुद्रधुनी तैवान देशापासून वेगळे करते. २०२० साली च्यामेन शहराची लोकसंख्या सुमारे ५२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ७३ लाख होती. च्यामेन चीनमधील एक प्रगत व सुबत्त शहर असून २००६ साली ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे निवासयोग्य शहर होते.
च्यामेन रेल्वे स्थानक हांगचौ-षेंचेन द्रुतगती रेल्वेमार्गावर स्थित आहे. च्यामेन गाओकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
च्यामेन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?