नान्निंग (चिनी: 南宁市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांग्शी या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१८ साली सुमारे ७२ लाख लोकसंख्या असलेले नान्निंग हे चीनमधील एक हरित शहर म्हणून ओळखले जाते. चीनच्या दक्षिण भागात क्वांगचौच्या पश्चिमेस वसलेले नान्निंग शहर व्हियेतनाम सीमेपासून केवळ १६० किमी अंतरावर आहे.
नान्निंग शहर क्वांगचौ व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. नान्निंग वुशू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
नान्निंग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.