षन्यांग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

षन्यांग

षन्यांग (मराठी नामभेद: शन्यांग, शेनयांग ; चिनी: 沈阳; फीनयीन: Shěnyáng ;), किंवा मुक्देन (मांचू: ), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर षंगचिंग (चिनी: 盛京) किंवा फेंगथ्यॅन विषय (चिनी: 奉天府) या नावांनी ओळखले जाई. इ.स.च्या १७व्या शतकात मांचू लोकांनी हे शहर जिंकले आणि काही काळासाठी येथे राजधानीचे ठाणे मांडून छिंग घराण्याने येथून सत्ता चालवली.

प्रशासकीय दृष्ट्या षन्यांगास उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून हे वायव्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले षन्यांग चीनच्या जपान, रशिया व कोरिया ह्या देशांसोबतच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →