षांतौ (चिनी: 汕头市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांगतोंग या प्रांतातले एक मोठे शहर आहे. षांतौ शहर क्वांगतोंगच्या पूर्व भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली षांतौ शहराची लोकसंख्या सुमारे ५५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी होती. १९व्या शतकात चीनच्या सर्वाधिक वर्दळीच्या बंदरांपैकी एक असलेले षांतौ विकासाच्या बाबतीत क्वांगचौ, षेंचेन इत्यादी महानगरांच्या तुलनेत मागे पडले. तरीही ते पूर्व क्वांगतोंग भागातील एक मोठे आर्थिक केंद्र आहे.
षांतौ रेल्वे स्थानक हांगचौ-षेंचेन द्रुतगती रेल्वेमार्गावर स्थित आहे. जियेंग चाओशान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
षांतौ
या विषयावर तज्ञ बना.