झूहै (चिनी: 珠海) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांगतोंग या प्रांतातले एक मोठे शहर आहे. झूहै शहर क्वांगतोंगच्या पश्चिम भागात मोती नदीच्या खोऱ्यामध्ये व दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली झूहै शहराची लोकसंख्या सुमारे १.२४ कोटी इतकी होती. झूहै हे क्वांगचौ-षेंचेन-हाँग काँग-मकाओ ह्या जगातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचा भाग असून ह्या महानगराची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६.५५ कोटी इतकी आहे.
२०१४ सालच्या एका अहवालानुसार झुहै हे चीनमधील सर्वात निवासयोग्य शहर होते.
झूहै
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.