सूचौ (देवनागरी लेखनभेद : सुझोऊ) हे चीन देशातील पूर्वेच्या ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर शांघायच्या १०० किमी पश्चिमेस यांगत्से नदीच्या काठावर वसले असून ते नांजिंग खालोखाल ज्यांग्सू प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१८ साली सूचौ शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.
इ.स.पूर्व ५१४ मध्ये स्थापन केले गेलेले सूचौ हान राजवंशामधील १० प्रमुख शहरांपैकी एक होते. १०व्या शतकापासून सूचौ उत्तर व पूर्व चीनमधील व्यापार व वाणिज्याचे मोठे केंद्र राहिले आहे. गेल्या काही दशकांदरम्यान सुचौ जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून ते चीनमधील एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाते. येथील कालवे, दगडी पूल, पॅगोडे व उद्यानांमुळे सुचौ चीनमधील एक मोठे पर्यटन केंद्र आहे तसेच येथील बागांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. येथील सूचौ आय.एफ.एस. ही जगातील सर्वाधिक उंच इमारतींमध्ये गणली जाते.
सूचौ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.