नारायण तातू राणे (एप्रिल १०, इ.स. १९५२ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते, २०१९ मध्ये ते भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत त्यांचे पुत्र निलेश नारायण राणे व नितेश नारायण राणे हेदेखील राजकारणी आहेत.१ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नारायण राणे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.