नारायण कुलकर्णी-कवठेकर (जन्मदिनांक ३० सप्टेंबर १९५१ - हयात) हे मराठी भाषेतील एक कवी व संपादक आहेत. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. कविता दशकाची या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. युगवाणी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघितले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नारायण कुलकर्णी कवठेकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.