युगवाणी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

युगवाणी नावाची अनेक नियतकालिके भारतातून प्रकाशित होतात. मार्च १९४५मध्ये डॉ. य.खु. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आकोट येथे झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनात संघाचे मुखपत्र असावे असा ठराव मांडण्यात आला. त्या काळात वऱ्हाड-मध्य प्रांतात वाङ्‌मय विषयास वाहिलेले एकही मराठी नियतकालिक नव्हते. ही उणीव दूर करण्यासाठीच 'युगवाणी' या नावाचे साहित्य विषयाला वाहिलेले एक त्रैमासिक १ जानेवारी १९४६पासून नागपूरहून प्रकाशित होऊ लागले. संपादनाची धुरा कवी वामन नारायण देशपांडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

मराठी भाषा व मराठी साहित्य यांची अभिवृद्धी करण्याचे धोरण 'युगवाणी’ने स्वीकारले. त्यानुसार ’युगवाणी’ची दृष्टी सर्वसमावेशक राहिली. प्रांतभेदातीत लेखन हे 'युगवाणी'चे वैशिष्ट्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →