वा.ना. देशपांडे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

वामन नारायण देशपांडे हे मराठीतील एक नामवंत लेखक व कवी होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते आद्य संपादक होते. देशपांडे मुळचे यवतमाळचे होते. दीनानाथ मंगेशकर आणि देशपांडे हे मित्र होते.

'विलोपले मधु मीलनात या' हे वा.ना. देशपांडे यांचे प्रसिद्ध गीत. हे दीनानाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले असून आशा भोसले यांनी गायले आहे. हे ब्रह्मकुमारी नाटकासाठी लिहिले होते. या नाटकात वा.ना. देशपांडे यांची एकूण १८ पदे होती. 'सुफलिता येथे विधिलेखा, अवतरत खास गमते, उषा विलोला, धरिला रूपा, वीणानाद काव्य आज हो मूर्त गमते' हे वा.ना. देशपांडे यांचेच दुसरे प्रसिद्ध गीत.

मुक्तछंदाच्या विकासात कवी वामन नारायण देशपांडे ह्यांचा लक्षणीय वाटा होता. या प्रकारच्या काव्यरचनेत त्यांनी चांगलीच प्रयोगशीलता दाखविली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →