दैवज्ञ ब्राह्मण हा बहुतांश भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारा हिंदू ब्राह्मण समाज आहे. ही दैवज्ञ ब्राह्मण हे देवाचे ज्योतिषी व देवाचे दागिने घडवणारे म्हणून ओळखले जातात. 1962 ला सुवर्ण कारागीर कायदा आल्यावर दैवज्ञ ब्राह्मण स्वतःला सोनार म्हणू लागले. त्यात हिंदू ब्राह्मण (चितपावन )समाजाबाबत, काही समाजात ब्रिटिश काळात द्वेष निर्माण झाला. त्यामुळे काही दैवज्ञ ब्राह्मण स्वतःची जात हिंदू सोनार सांगु लागले..वास्तविक हा दैवज्ञ ब्राह्मण पश्चिम किनारपट्टीला राहत असल्याने, मत्स्य आहार त्याना अनिवार्य बनला. गोवा किनाऱ्यावरील कर्नाटक, केरळ तसेच किनाऱ्यावरील महाराष्ट्राची निवासी आहे. मध्य युगात हा समाज पुजापाठ व सुवर्ण कारागिरी यात पारंगत झाला. या क्षेत्रात यांना 'शेठ' म्हणले जाते, जे 'श्रेष्ठ' किंवा 'श्रेष्ठिन्'चा अपभ्रंश आहे. हे लोक मूळचे सरस्वती नदीजवळचे असून तत्पूर्वी त्यांचे निवास अन्य ठिकाणी होते..मराठी समाज हा बहुतांशी राज्यस्तान, गुजरात, माळवा, उत्तरभारतातील आहे.. दैवज्ञ् ब्राह्मण हे पुढे गोवा, उत्तर कर्नाटक येथे स्थायिक झाले. गोव्यातील असून इस्लामी व पोर्तुगीज आक्रमणांमूळे कर्नाटकात ,महाराष्ट्रात तसेच केरळात स्थायिक झाले.ते कोंकणी तसेच मराठी बोलतात, पौरोहित्य करणारे दैवज्ञ ब्राह्मण पुरोहित वगळता ईतर मत्स्याहारी असून जवाहिरे आणि सोन्याचा धंदा करतात. त्यांच्यात वशिष्ठ अत्रि, कौशिक, भारद्वाज,वत्स इ. गोत्रें असून ते प्रामुख्याने शांकरमतानुयायि आहेत तसेच थोडे लोक मध्वानुयायि आहेत.ते आपले पुर्वज शाकद्वीपि मग लोक आहेत असे मानतात.आद्य शंकराचार्य हे दैवज्ञ् ब्राह्मण असावेत. मात्र त्यांना नंबुद्री ब्राह्मण म्हटले गेले आहे. हा एकनिष्ठ सनातनी हिंदू धर्मीय समूह आहे. समूहाची भाषा शुद्ध व मुख्य प्रवाहातील आहे. आद्य शंकराचार्य, अनेक स्वातंत्र्य सैनिक, भारतीय माणसाने मुलींची पहीली शाळा काढणारे (ब्रिटिश काळात) आशियाई रेल्वेचे जनक मुंबईचे ब्रिटिश कालीन मेयर (महापौर) नाना शंकरशेठ मिरकुटे, दामू अण्णा मालवणकर, अंजली वेदपाठक, स्वप्नील बांदोडकर, संजय नार्वेकर, अशी असंख्य ज्ञात समाजाची नावे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दैवज्ञ ब्राह्मण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.