महार हा एक भारतीय जातसमूह असून तो प्रामुख्याने महाराष्ट्रात तसेच लगतच्या राज्यांमध्ये राहतो. हा अनुसूचित जातीचा समाज आहे. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ९ ते १०% महार आहेत. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओरिसा, तेलंगणा तामिळनाडू या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण सुमारे ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत. आज ८०% महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे तर २०% महार हे हिंदू धर्म मानतो.
मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार समाजाची आहे.
महार
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!