अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती

अनुसूचित जाती अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास (मागास वर्ग) म्हणून ओळखले जात होते. अनुसूचित जातींमध्ये कितीतरी टक्के लोक मूलत: भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोक आहेत.

आधुनिक साहित्यात अनुसूचित जातींचा उल्लेख कधी कधी आदि-द्रविड (?) म्हणून होतो.

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे १६.६% आणि ८.६% आहे. या दोन समूहांची एकत्रित लोकसंख्या ही २५.२% (३१ कोटी) आहे, जर ही संख्या एक देश म्हणून गृहीत धरली तर हा चीन, भारत व अमेरिका ह्यांनंतर जगातला चौथा सर्वात मोठा देश ठरू शकतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संविधानाद्वारे या मागास समजल्या जाणाऱ्या समूहांना आरक्षण लागू करण्यात आले. आणि कलम (अनुसूचित जमाती) आदेश १९५०, २२ राज्यांतील ७४४ जमातींची नोंद करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →