देशस्थ ब्राह्मण ही महाराष्ट्रीय सनातन वैदिक हिंदूंच्या ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती कऱ्हाडे, चित्पावन, देवरुखे , दैवज्ञ व सारस्वत ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या ऋग्वेदी व यजुर्वेदी ह्या दोन शाखा आहेत. देशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रात व कर्नाटकच्या उत्तर भागात आढळतो.
गेल्या दोन सहस्र वर्षात देशस्थ समाजाने अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे निर्माण केली आहेत. यामध्ये भास्कर II सारखे गणितज्ञ, भवभूती सारखे संस्कृत विद्वान, ज्ञानेश्वर, श्रीपादराजा, एकनाथ, पुरंदर दास, समर्थ रामदास आणि विजय दास सारखे भक्ती संत आणि जयतीर्थ आणि व्यासतीर्थ यांसारखे तर्कशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.
आदी शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना धर्मपीठे स्थापन केली. या चारही पीठाच्या व्यवस्थेसाठी शंकराचार्यांनी कोल्हापूरकडील चार देशस्थ ब्राह्मणांची मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. जगद्गुरू शंकराचार्यांच्या केरळमधल्या कालडी या गावातील वेदपाठशाळेचे मुख्य कमलाकर नावाचे देशस्थ ब्राह्मण आहेत. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या आसपास स्थायिक झालेल्या मराठी ब्राह्मणांपैकी जवळजवळ सगळे देशस्थ ब्राह्मण असतात.
देशस्थ ब्राह्मण
या विषयावर तज्ञ बना.