डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, १९२० ; मूर्तिजापूर - जुलै ३०, १९८३ ; पुणे) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.
देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षी देशपांडे यांची क्षमता भालजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना 'कालिया मर्दन' (१९३५) या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली. त्यांनी संगीत विषयात पीएचडी केली होती.
देशपांडे यांनी शंकरराव सप्रे, असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ, अंजनीबाई मालपेकर, रामकृष्णबुवा वझे अशा विविध गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण विभागात हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी गायक राहुल देशपांडे हे वसंतरावांचे नातू आहेत.
वसंतराव देशपांडे
या विषयातील रहस्ये उलगडा.