सोनार समाज
(इंग्लिश: Goldsmith, गोल्डस्मिथ) म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर सुवर्णकार होय. सोनार हा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणाऱ्या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. आज सोन्याचा व्यवसाय हा सोनार वर्गा पुरता मर्यादित नाही इतर सर्व समाजाचे लोक कारागिरी व सराफा करत आहेत.
पारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड, फुंकणी, इ. हत्यारे व बागेश्वरी वापरली जात असत.
अत्यंत प्राचीन व सनातन असणारा हा समाज, विविध ग्रंथात, पुराणात याचा उल्लेख सापडतो. अनेक संत महात्मे या समाजात होऊन गेले. अत्यंत शांत प्रिय व कर्मनिष्ठ समाज म्हणून ओळख आहे. सोनार समाजात अनेक उप पोटशाखा आहेत उदा. दैवज्ञ, अहिर, लाड, वैश्य, पांचाळ (पाच गोत्रांचा) विश्वब्राह्मण, बंजारा, टाक, मारवाडी अस्या १२५ गोत्र व विविध पोटजाती आहेत. पूर्वी हा समाज एकच होता आज ही एकमेकांची गोत्र एकमेकांशी जुळतात. दैवज्ञातील गोत्रे पांचाळ, लाड, अहिर मध्ये सापडतात.
भटकंती करत राज दरबारी आश्रय मिळाला आणि चाली रिती, खान पान, भाषा, संस्कार, गोत्र, दैवत यात बदल झाला. त्यावरून वर्ण व्यवस्था निर्माण झाली. पांचाळ व दैवज्ञा मध्ये उपनयनादी सर्व संस्कार केले जातात पूर्वी हा समाज शाखाहारी होता. सोनार समाजातील आचार्य असून. लाड व आयर (अहिर) हे क्षत्रीय समाज संबोधले जातात. वैश्य व इतर व्यापारी मध्ये शाखा मोडतात. काळाप्रमाने लिंगायत, जैन आदि इतर धर्म स्वीकारल्या मुळे त्यांची नावे व संस्कार या मध्ये बराच फरक पडला.
सोनार समाज हा मूळ हिंदू धर्म आहे. विश्वकर्मा पासून हा समाज उत्पन्न झाला. बागेश्वरी मुळ कालीका असल्यामुळे कालीका व विश्वकर्मा समाजाचे मुख्य दैवत असून. महादेव, खंडोबा, भैरोबा, विठ्ठल, बालाजी हे कुलस्वामी आणि तुळजाभवानी, रेणुका, योगेश्वरी, शिरसिंगी कालीका आदि कुलदेवता आहेत.
सोनार
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.