संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील थोर वृद्ध वैष्णव संत. ज्यांनी लग्न झाल्यानंतर वयाच्या २० व्या वर्षी शैव दीक्षा घेतली पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. व २६ व्या वर्षी परत वैष्णव झाले. त्यांचे संपूर्ण कुळ वैष्णव होते, काही लोक कट्टर शैव म्हणतात पण त्यांच्या कुळात जेवढे व्यक्ती झाले त्या सर्वांची नावे विष्णूंची आहेत. वडील अच्युत, आजोबा मुरारी, पणजोबा मुकुंद, नरहरी महाराजांचा मुलगा नारायण यात एकाचेही नाव शिवाचे नाही पण ४-५ वर्षांचा काळ कट्टर शिव उपासनेत घातला. कारण लग्न होऊन ही पुत्र संतती होतं नाही म्हणून विठ्ठलाचे तोंड पाहणार नाही असा ठाम निश्चय केला पण विठ्ठल साक्षात्काराने अज्ञान नष्ट झाले व पुढे मुलाचे नाव नारायण ठेवले.
रामचंद्र- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी -नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते.
त्यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला. ते मुळचे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानातील म्हेत्रे गावचे.
आडनाव महामुनी मुळ मेहत्रे वतन । मिरासी दुकान महाद्वारी ।। (संत नामदेवाचा अभंग)
तेथून देवगिरी, नवगण राजूर ते पंढरपूर असा प्रवास झाला.
परधावी नाम संवत्सरे शके अकराशे पंधरा । प्रातःकाळी जन्मला नरहरी ।। श्रावण मास शुक्लपक्ष त्रयोदशी । नक्षत्र अनुराधा बुधवारी ।
संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी, आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा मंगळवेढ्या जवळील ब्रह्मपूरी गावच्या सानकस्य गोत्रात श्रीपती वेदपाठक ( पोतदार ) यांची मुलगी तर मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ अशी होती. त्यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्री बाई असे होते. त्यांना नाईक, पोतदार( हे उपनाम दक्षिण भारतात पत्तार या शब्दापासुन झाले म्हणून विश्वकर्मीय सोनारांना ही उपाधी आहे, पूर्वी सोनार समाजात पोटशाखा नव्हत्या. समाज व्यापारासाठी इतरत्र गेला तेव्हा काल देश परत्वे खान पान, राहणी बदलली ब्राह्मण - पांचाळ व दैवज्ञ, क्षत्रीय - लाड व आयर/ अहिर, वैश्य - वैश्य, लिंगायत, बंजारा, सोनी व इतर असे वर्ण व्यवस्था झाली त्या आधी संपुर्ण समाज विश्वकर्मा ब्राह्मण समाजच होता. सगळे एकच असून नंतर भेद निर्माण झाला), सोनार अस्या उपाध्या प्राप्त होत्या तसेच संत नरहरी महाराज हे वयोवृद्ध संत असल्यामुळे संतजन त्यांना महामुनी सुद्धा म्हणत असत. त्यामुळे महाराज महामुनी सोनार नावाने ओळखले जातात (संत नामदेव महाराज, संत चांगदेव व मालू कवींनी आरती व अभंगात याचा उल्लेख केला आहे तो तपासून घ्यावा. मालूतारणची मुळप्रत उपलब्ध नसून संस्कारीत प्रत आहे त्यातील बदललेला मजकुर तपासावा)
नरहरी सोनार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.