देवेंद्र सरीता गंगाधराव फडणवीस (जन्म:२२ जुलै १९७०:नागपूर, भारत - हयात) हे भारतीय राजकारणी व ५ डिसेंबर २०२४ पासून भारताच्या महाराष्ट्र राज्याचे १८वे व विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ आणि २३-२८ नोव्हेंबर २०१९ अशा २ कार्यकाळांसाठी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण केले आहे.
३० जून २०२२ ते ४ डिसेंबर २०२४ दरम्यान ते महाराष्ट्राचे ९वे उपमुख्यमंत्री देखील राहिले.
तत्पूर्वी ते २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
देवेंद्र हे १९९९ ते २००९ दरम्यान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून तर २००९ पासून दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.
३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे २रे सर्वात तरुण मुख्यमंत्री. त्यापूर्वी, वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
२०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळली म्हणून देखील त्यांची विक्रमीनोंद आहे.
देवेंद्र फडणवीस
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.