अभिमन्यू पवार

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अभिमन्यू दत्तात्रय पवार हे भारतीय जनता पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयमधून वाणिज्य मध्ये पदवी पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कर्मचारी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. ते २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक सहाय्यक होते. ते विशेष कर्तव्यावर अग्रणी अधिकारी (ओएसडी), वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे एक आघाडीचे व सुप्रसिद्ध सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →