देल्सी एलोइना रॉद्रिगेझ गोमेझ (१८ मे, १९६९:काराकास, व्हेनेझुएला - ) या व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने या वकील, राजदूत आणि राजकारणी आहेत. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यापासून त्या राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. रॉद्रिगेझ २०१८ ते २०२६ पर्यंत व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्ष होत्या. याशिवाय त्यांनी ह्युगो चावेझ आणि मादुरो यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पदे सांभाळली आहेत.
रॉड्रिग्ज ही व्हेनेझुएलाच्या युनायटेड सोशलिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वातील एक आहेत. युरोपियन संघ, अमेरिका आणि कॅनडाने त्यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या कठोर निर्बंधांनंतरही त्यांनी अनेक वर्षांच्या संकटानंतर व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यात आणि देशाचे तेल उत्पादन वाढविण्यात यश मिळवले.
देल्सी रॉद्रिगेझ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.