मरिया कोरिना माचादो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मरिया कोरिना माचादो

मरिया कोरिना माचादो पारिस्का (७ ऑक्टोबर, १९६७:काराकास, वेनेझुएला. - ) या व्हेनेझुएलाच्या राजकारणी आहेत. या उगो चावेझ आणि निकोलस मादुरो यांच्या सत्ताकालतील विरोधी नेत्या आहेत. या २०११ ते २०१४ पर्यंत राष्ट्रीय सभेच्या सदस्या होत्या. मादुरो राजवटीच्या दडपशाहीचा सामना करीत त्यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मादुरो विरुद्ध त्या उभ्या राहिल्या. माचादो स्वतःला मध्यमार्गी आणि उदारमतवादी म्हणवून घेतात.

माचादो औद्योगिक अभियंता असून त्यांनी वित्त विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. २०१२ च्या विरोधी पक्षनेता पदासाठीच्या प्राथमिक निवडणुकीत त्या हेन्रिक कॅप्रिलेस यांच्याकडून पराभूत झाल्या. २०१४ च्या व्हेनेझुएलातील निदर्शनांमध्ये, त्यांनी मादुरो सरकारविरुद्ध निदर्शने आयोजित करण्यात प्रमुख भूमिका बजावली.

२०२३ मध्ये माचादो यांनी पक्षनेत्या झाल्या आणि २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षांतर्फे उमेदवार झाल्या. व्हेनेझुएलाच्या सरकारने त्यांना निवडणुकीत उतरण्यास बंदी घातली. त्यावेळी माचादोने कोरिना योरिस यांना आपल्या ऐवजी उभे केले. त्यांच्याजागी नंतर एदमुंदो गोंझालेझ यांची निवड झाली. निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी मतदानाचे आकडे सादर करीत दावा की गोंझालेझ यांनी मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकली. तर मादुरो सरकारने कोणताही पुरावा न देता आपण जिंकल्याचे जाहीर केले. २८ जुलै, २०२४ च्या या निवडणुकीनंतर माचादो मादुरो राजवटीत त्यांच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला भीती असल्याचे कळल्यावर काही काळासाठी अज्ञातवासात गेल्या.

माचादो यांना त्यांच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. २०२५ मध्ये, व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याआधीही त्यांना अनेक सन्मान मिळालेले आहेत.

५ जुलै २०११ रोजी व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या द्विशताब्दी समारंभात सहभाग घेताना माचादो यांनी पूर्वी व्हेनेझुएलाच्या क्युबावरील परावलंबनावरील वक्तव्यांवरून संतापलेल्या सरकारी हस्तकांनी माचादोवर हल्ला केला. सुमारे ५० जणांच्या गटाने त्यांच्यावर दगड आणि बाटल्या फेकल्या; पोलिसांनी त्यांचा बचाव करीत मोटरसायकलवरून त्यांना पसार केले. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला होता.

माचादो यांना लोखंडी व्यक्तिमत्व असलेली स्त्री असे म्हणले जाते द न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, समर्थक तिला "इतर अनेक राजकारणी पळून गेले असताना व्हेनेझुएलामध्ये राहून सरकारविरुद्ध धाडसाने काम करणारी स्त्री" असे त्यांचे वर्णन केले आहे.

माचादो घटस्फोटित असून त्यांची तीन मुले आहेत परदेशात राहतात. त्यांना घरी राहिल्यास मारण्याच्या धमक्या असल्याने त्यांनी मुलांना दूर ठेवणे स्वीकारले आहे. माचादो कॅथोलिक धर्माचे पालन करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →