कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे

या विषयातील रहस्ये उलगडा.

कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे

कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे (संत फुलांची मेरी हिचे कॅथेड्रल) तथा फ्लोरेन्स कॅथेड्रल हे इटलीच्या फिरेंझे शहरातील मुख्य कॅथेड्रल आहे. फिरेंझे शहर, प्रजासत्ताक आणि इटलीमधील अनेक ऐतिहासिक घटना येथे घडल्या. याची बांधणी १२९६मध्ये गॉथिक शैलीमध्ये आर्नोल्फो दि कँबिओने सुरू केली आणि १४३६मध्ये फिलिपो ब्रुनलेशीने येथील प्रचंड घुमटाची रचना संपवत कॅथेड्रल पूर्ण केले; या इमारतीच्या भिंतीं बाहेरून पांढऱ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या विविध छटांतील संगमरवरी दगडांनी बांधलेल्या आहेत. १९व्या शतकात एमिलियो दे फॅब्रिसने कॅथेड्रलचा भव्य दर्शनी भाग बांधून काढला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →