बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.
ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.
सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.
बोलिव्हिया
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.