दुती चंद

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दुती चंद

दुती चंद (जन्म ३ फेब्रुवारी १९९६ जाजपूर, ओडिशा) ही एक भारतीय व्यावसायिक धावपटू आणि महिलांच्या १०० मीटर स्पर्धेत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. उन्हाळी ऑलिंपिक खेळांमध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यतीसाठी पात्र ठरणारी ती तिसरी भारतीय महिला आहे.

ती १०० मीटर स्पर्धेत राष्ट्रीय विजेती आहे. (आय.ए.ए.एफ) हायपरअँड्रोजेनिझम नियमांमुळे एकेकाळी बाहेर बसण्यास भाग पाडलेली चंद, पीटी उषाने १९८० च्या मॉस्को ऑलिंपिकमध्ये भाग घेतल्याच्या ३६ वर्षांनंतर, रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या १०० मीटर स्पर्धेसाठी पात्र ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →