दिवस आलापल्लीचे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आलापल्ली हे गडचिरोली जिल्ह्यातील एक सुंदर फॉरेस्ट व्हिलेज. तिथे बँकेतील नोकरीच्या निमित्ताने एक कुटुंब शहरी भागातून रहायला येते. त्या कुटुंबातील एका लहान मुलीच्या आठ ते अकरा वर्षे वयातील बालपणीच्या आठवणी म्हणजे दिवस आलापल्लीचे हे पुस्तक.

फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटचे हत्ती, त्यांच्या शाळेकडेच्या ओढ्यातल्या आंघोळी, शाळेतली आदिवासी मुले, आदिवासींच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, त्यांची गरिबी, जादूटोणा, जवळच असलेली बाबा आमटेंची लोकबिरादरी, लेखिकेच्या कुटुंबाला लाभलेला बाबा आमटेंचा सहवास.. ही सगळी वर्णने पुस्तकाला वेगळी उंची प्रदान करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →