दानिश मुज्तबा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दानिश मुज्तबा (२० डिसेंबर, १९८८:प्रयागराज, उत्तर प्रदेश, भारत - ) हा भारतकडून खेळलेला हॉकी खेळाडू आहे. हा प्रामुख्याने आघाडीच्या फळीत आणि मध्यातून खेळतो. याच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध हॉकी खेळाडू आहेत. त्याचे आजोबा इद्रिस अहमद, काका आतीफ इद्रिस आणि मोठा भाऊ हमझा मुज्तबा हे सुद्धा भारतीय हॉकी संघाकडून खेळलेले आहेत. दानिशने दिल्लीतील एर इंडिया-साई हॉकी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि २००९ मधील कनिष्ठ जागतिक चषक स्पर्धेतून भारतीय कनिष्ठ संघात पदार्पण केले.

त्याने २००९ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण केले आणि २०१० च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. दानिशने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक आणि २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ मधील सुलतान अझलान शाह चषक स्पर्धेत त्याने भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले होते. त्याने २०१४ च्या इंचॉन आशियाई खेळांमधील सुवर्णपदक, तसेच २०१० (दिल्ली) आणि २०१४ (ग्लासगो) मधील राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्यपदके मिळवली आहेत. तो देशांतर्गत हॉकीमध्ये हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्ली वेवरायडर्स कडून खेळला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →