दत्ता भट (२४ डिसेंबर, इ.स. १९२४ - १ एप्रिल, इ.स. १९८४)हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांतून अजरामर भूमिका केल्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटच्या ४०० प्रयोगांमध्ये दत्ता भट हे गणपतराव बेलवरकरांच्या भूमिकेत होते. त्यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांनी ती भूमिका सोडली.
दत्ता भट यांनी डॉक्टर लागू, तुझे आहे तुजपाशी, फुलाला सुगंध मातीचा, आणि वेडा वृंदावन या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
दत्ता भट
थोडक्यात पण महत्त्वाचे.