विश्राम बेडेकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विश्राम बेडेकर ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर,एम्‌. ए. एल्‌एल.बी. (जन्म : अमरावती, ऑगस्ट १३, १९०६ - - पुणे, ऑक्टोबर ३०, १९९८) हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचे शिक्षण अमरावती आणि नागपूर येथे झाले होते. मराठी लेखिका मालती बेडेकर (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत.

मराठी रंगभूमीवरील नट चिंतामणराव कोल्हटकर व गायक नट मास्टर दीनानाथ यांनी स्थापन केलेल्या केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या ’कृष्णार्जुन युद्ध’ ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले (१९३४). त्याअगोदर मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी (१९३३) हे नाटक त्यांनी लिहिले होते. ’बलवंत पिक्चर्स’ ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी ’कृष्णार्जुन युद्धा’चे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रपट संस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी यांच्या ’ठकीचे लग्न’ आणि चि.वि. जोशी यांच्या ’सत्याचे प्रयोग’ या विनोदी कथांवर त्यांनी चित्रपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी चित्रपट होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →