दामूअण्णा बापूशेठ मालवणकर (८ मार्च, १८९३:निपाणी - १४ मे, १९७५:मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट-नाटकांतून बव्हंशी विनोदी भूमिका करणारे नट होते. ते नायकाची तसेच खलनायकाची भूमिकासुद्धा करीत. त्यांचा एक डोळा चकणा होता, त्यामुळे प्रेक्षकांना ते विनोदी वाटत असे.
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्दफेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.
दामूअण्णा मालवणकरांची मुलगी भारती मालवणकर ही हृदयनाथ मंगेशकर यांची पत्नी आहे. तिला जेव्हां पु.ल. देशपांडे यांनी पहिल्यांदा पाहिली, तेव्हां ते उदगारले, "ही मुलगी दामुअण्णांचा डोळा चुकवून जन्माला आली असणार!'
दामूअण्णा मालवणकर
या विषयावर तज्ञ बना.