दत्ता केशव

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दत्ता केशव कुलकर्णी (१९३३ - १८ जानेवारी, २०१९) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक होते.

गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे चित्रपटांच्या दुनियेत सन १९६४ साली आले. त्यांची कारकीर्द ४२ वर्षांची होती. हे अनंत माने, दत्ता धर्माधिकारी, भालजी पेंढारकर, राजा परांजपे यांच्यासारख्या नामवंत मराठी दिग्दर्शकांचे समकालीन होते.

दत्ता केशव यांनी अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. याशिवाय त्यांनी अनेक नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. दोन चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →