दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला श्रीलंका दौरा होता. दोन्ही देशांनी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्ध १९६५ मध्ये मालिकाविजयानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विदेशी भूमीवर कसोटी मालिका जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?