दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने दक्षिण आफ्रिकेवरील बंदी उठवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची ही पहिली वहिली आंतरराष्ट्रीय मालिका होती. दक्षिण आफ्रिकेने ५ मार्च १९७० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कृत होण्याआधी खेळलेला शेवटचा सामना होता. तब्बल २१ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन केले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला भारत दौरा होता आणि पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने खेळला. वर्णभेदामुळे मूलत: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केप्लर वेसल्स जो ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता, त्याने दक्षिण आफ्रिकेतर्फे म्हणजेच त्याच्या देशातर्फे पदार्पण केले.

भारताने पहिले दोन सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेने तिसरा सामना जिंकला. हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →