दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९१-९२

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९१-९२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने एप्रिल १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिका देखील वेस्ट इंडीजने ३-० ने जिंकली.

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका होती. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन झाल्यानंतरचा हा पहिला कसोटी सामना होता. याआधी दक्षिण आफ्रिकेने तब्बल २१ वर्षांपूर्वी ५ मार्च १९७० रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकी संघ बहिष्कार होण्याच्या आधी केवळ श्वेतवर्णीय देशांच्या बरोबरच क्रिकेट खेळायचा. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा वेस्ट इंडीज दौरा खऱ्या अर्थाने वर्णभेदाच्या मुद्द्याला कठोर उत्तर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →