दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने पर्थ आणि होबार्टमधील कसोटी सामने जिंकून मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.
एप्रिल २०१६ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुचवले की ॲडलेड ओव्हलवर खेळवली जाणारी तिसरी कसोटी दिवस-रात्र खेळवण्यात यावी, परंतु दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू याबबत थोडे नाखुष होते. जून महिन्यात, ॲडलेड कसोटी दिवस-रात्र होण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आले. मालिकेआधी दोन्ही संघांचे दिवस/रात्र सराव सामने झाले.
दिवस-रात्र कसोटी सामन्याची पुर्वतयारी म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ॲडलेड ओव्हल आणि मेलबर्न क्रिकेट मैदान याठिकाणी २ दोन-दिवसीय सराव सामन्यांमध्ये भाग घेतला.
दुसरी कसोटी संपल्यानंतर, चित्रफितीवरून निदर्शनास आले की दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तोंडातील लाळेने चेंडूला लकाकी आणत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने त्याच्यावर चेंडूशी फेरफारीचा आरोप ठेवला पण त्याने ते नाकारले. हाशिम आमला म्हणाला की ही परिस्थिती "हास्यास्पद" आणि "एक विनोद आहे". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने कायदेशीर प्रतिनिधित्व गुंतवल्याने, सदर प्रकरणाची सुनावणी तिसरी कसोटी झाल्यानंतर घेण्यात यावी असे सुचवले गेले. परंतू, २२ नोव्हेंबर रोजी डू प्लेसीला दोषी करार दिले गेले, आणि होबार्ट कसोटीच्या संपूर्ण मानधनाचा दंड करण्यात आला, परंतून त्याला ॲडलेड कसोटीमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली. दोषी करार दिल्यानंतर डू प्लेसीने निकाल अमान्य करताना नमूद केले की "मला वाटलं मी काहीच चुकीचं केलेलं नाही".
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?