हेन्री डेव्हिड थोरो (इंग्रजी: Henry David Thoreau), अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक लेखक, कवी आणि विचारवंत.
जन्म: जुलै १२ इ.स. १८१७ मृत्यु: मे ६ इ.स. १८६२ .
आधुनिक अमेरिकेचा महत्त्वाचा लेखक म्हणून थोरो यांना ओळखले जाते. ते आपल्या वॅल्डन पुस्तकासाठी जे की निसर्गाच्या सनिध्यातील साध्या राहणिमानाबद्दल आहे. थोरोने विसपेक्षा ज्यादा पुस्तके, लेख, निबंध आणि कविता लिहिल्या. थोरोच्या तत्त्वज्ञानात मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पहावयास मिळतो. कारण त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने प्राचीन पुराण कथांचा संदर्भ दिसून येतो. जसे त्याच्या कवितांमध्ये 'उपनिषदे, रामायण, महाभारत तसेच, अद्वैतवाद यांचा संदर्भ दिसतो.
थोरो हा प्रामुख्याने अमेरिकन ट्रान्सलडेंटल तत्त्वचिंतक होता. त्याने सन १८३२ साली 'ट्रान्सलडेंटल क्लब' स्थापन केले. त्याचे सर्व लिखाण हे ट्रान्सलडेंटल तत्त्वज्ञानावर आधारित आहे.
थोरो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.