अनागरिक धम्मपाल (सिंहला: අනගාරික ධර්මපාල; १७ सप्टेंबर १८६४ - २९ एप्रिल १९३३) हे श्रीलंकन (सिंहली) बौद्ध पुनरुज्जीवक आणि लेखक होते. ते पहिले जागतिक बौद्ध धर्मप्रचारक होते. ते अहिंसक सिंहली बौद्ध राष्ट्रवादाचे संस्थापक आणि ब्रिटिश राजवटीविरूद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी व्यक्ती होते. अनेक शतके भारतात अक्षरशः नामशेष झालेल्या बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते अग्रेसर होते आणि आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन खंडांत धर्म उपदेश करणारे ते आधुनिक काळातले पहिले बौद्ध होते. हेन्री स्टील ऑलकोट आणि थेओसॉफिकल सोसायटीचे निर्माते हेलेना ब्लाव्हत्स्की यांच्या बरोबर ते श्रीलंकेतील सिंहली बौद्ध धर्माचे प्रमुख सुधारक आणि पुनरुज्जीवन करणारे आणि पश्चिमेकडील प्रसारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्या शतकापूर्वी, तामिळ लोकांसह दक्षिण भारतीय दलितांच्या जनआंदोलनास त्यांनी प्रेरित केले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध भिक्खूंच्या अनुभवात श्री देवमित्ता धर्मपाल म्हणून संघात प्रवेश केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनागरिक धम्मपाल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!