बौद्ध धर्म

या विषयातील रहस्ये उलगडा.

बौद्ध धर्म

बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism) हा भारताच्या श्रमण परंपरेतून उदयास आलेला एक धम्म (जीवनपद्धती आणि तत्त्वज्ञान) आहे. याला बौद्ध धम्म, बुद्ध धर्म किंवा बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६व्या शतकात धम्मचक्रप्रवर्तन करून बौद्ध धर्माची शिकवण दिली. बौद्ध परंपरेनुसार, गौतम बुद्ध हे पहिले बुद्ध नव्हते; त्यांच्यापूर्वीही बुद्ध झाले होते, आणि ही अनादि परंपरा त्यांनी पुढे नेली, याचा उल्लेख त्रिपिटक ग्रंथांत (विशेषतः बुद्धवंश) आढळतो. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि पुढील दोन सहस्रकांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय आशियात तसेच जगभर पसरला. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मवादी, समतावादी, विज्ञानवादी आणि मानवतावादी धर्म मानला जातो. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. हा धर्म स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मैत्री, प्रज्ञा आणि मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता आहे.



इ.स. २०१० च्या अंदाजानुसार, जगभरात सुमारे ४८.९० कोटी ते ५३.५० कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी होते, जे जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे ७% ते ८% होते. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म आहे. ख्रिश्चन धर्म (२.४ अब्ज), इस्लाम (१.९ अब्ज) आणि हिंदू धर्म (१.२ अब्ज) हे जगातील तीन सर्वात मोठे धर्म आहेत. सर्वाधिक बौद्ध अनुयायी चीन, जपान, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशांत आहेत. आशिया खंडात बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे, आणि आज तो १५० हून अधिक देशांत आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →