भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म (इंग्रजी: The Buddha and His Dhamma) हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. ‘द बुद्ध अॅण्ड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने १९५७ साली पहिल्यांदा प्रकाशित केला. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे.
इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले होते की, हा ग्रंथ त्या तीन पुस्तकांपैकी एक आहे, जे बौद्ध धर्माच्या योग्य समस्यांसाठी एक संच तयार करेल. इतर पुस्तके आहेत: (१) बुद्ध आणि कार्ल मार्क्स; आणि (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती.
इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद हिंदी व पंजाबी या दोन भाषेत केले तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी मराठी भाषेत केला आहे.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.