बौद्ध धर्माचा इतिहास

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बौद्ध धर्माचा इतिहास

सम्राट अशोक (इ.स.पू. २६० – २१८)च्या शिलालेखानुसार, बौद्ध धर्माचा प्रसार त्याच्या काळात खूप दूरवर झाला होता. सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे तथागत बुद्ध दिव्य आध्यात्मिक अवस्थांमधील विभूती मानले जातात. जगभरातील कोट्यवधी लोकांनी भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्ग या आठ सिद्धान्तांवर विश्वास ठेवलेला आहे. भगवान बुद्धांच्या मते, धम्म जीवनाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी,व परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी तृष्णा सोडणे आवश्यक आहे. याशिवाय, भगवान बुद्धांनी सर्व संस्कारांना कायमचे वर्ज्य केले आहे. भगवान बुद्धंनी नैतिक संस्थेचा आधार म्हणून मानवाचे वर्णन केले आहे. भगवान बुद्धांनुसार, धम्म म्हणजेच प्रत्येकासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणे. त्यांनी असेही सांगितले की विद्वान असणे पुरेसे नाही. विद्वान म्हणजे जो आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वाना प्रकाशित करू शकतो. धम्म लोकांच्या जीवनाशी एकरूप करतो. भगवान बुद्ध म्हणाले की करुणा शील आणि मैत्री हे मानवात आवश्यक गुण आहेत. याव्यतिरिक्त, बुद्धांनी सामाजिक भेदभावही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असे सांगितले की कर्मांच्या आधारे, जन्माच्या आधारावर लोकांचे मूल्यांकन करता कामा नये. जगभरात कोट्यवधी लोक भगवान बुद्ध यांनी दर्शविलेला मार्ग अनुसरून आपले जीवन सार्थक करत आहेत.

तथापि, गौतम बुद्ध स्वतःला देव अथवा ईश्वराचा प्रेषित म्हणत नसत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →