तुकाराम मुंढे (३ जून, १९७५:ताडसोना, बीड, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील २००५ सालचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
मुंढे आणि त्यांच्या भावाने जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. मुंढे हे अतिशय उज्ज्वल विद्यार्थी होते. त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र विषय घेऊन त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परीक्षेत प्रावीण्य मिळवले व त्यांना दुसऱ्या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया संपेपर्यंत त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.
तुकाराम मुंढे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.