तिनसुकिया भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,४४८ होती. हे शहर तिनसुकिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. आसामच्या भाषेत तिनिसुकिया म्हणजे तीन कोपरे होय. त्या भागात असणाऱ्या त्रिकोणी तळ्यावरून त्या गावाला तिनिसुकिया नाव पडले असे तेथील जाणकार सांगतात. तिनिसुकियाचा बराचसा भाग हा बंगाली आहे. तिनिसुकिया हे पूर्व आसाम मधील एक महत्त्वाचे शहर समजले जाते. तेथे गावाबाहेर दूरवर पसरलेले चहाचे मळे पहायला मिळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिनसुकिया
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.