शिलॉँग ही भारताच्या मेघालय राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. त्याचबरोबर शिलाँग पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १९७४ ते १९७२ दरम्यान संयुक्त आसाम प्रांताच्या राजधानीचे शहर राहिलेले शिलाँग १९७२ साली मेघालय राज्याच्या निर्मितीनंतर मेघालयच्या राजधानीचे शहर बनले व आसामची राजधानी गुवाहाटीमधील दिसपूर येथे हलवण्यात आली. आजच्या घडीला मेघालयची आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य राजधानी असलेल्या शिलाँगची लोकसंख्या २०११ साली सुमारे १.४३ लाख इतकी होती. आजच्या घडीला येथील ४७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय तर ४२ टक्के लोक हिंदू आहेत. इंग्लिश ही येथील अधिकृत भाषा असून खासी व गारो ह्या दोन स्थानिक भाषांना राजकीय दर्जा देण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिलाँग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?