मेघालय

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मेघालय

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलाँग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली, मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. तिथे उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ आहे. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्रजी ही येथील राजभाषा आहे. येथे प्रामुख्याने खासी व गारो वंशाचे लोक आढळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →