चेरापुंजी हे भारताच्या मेघालय राज्यामधील एक नगर आहे. अनेक वर्षे चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान होते (ह्याबाबत सध्या जवळील मॉसिनराम हे गाव जगात अव्वल क्रमांकावर आहे). खासी जमातीच्या साम्राज्याचे पारंपारिक राजधानीचे ठिकाण असलेले चेरापुंजी गाव मेघालयची राजधानी शिलाँगच्या ५५ किमी दक्षिणेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १४ हजार होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेरापुंजी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.