पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की जल प्राप्ती होते. पावसामुळे धरती हिरवीगार होते. सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या, विहिरी तुडूंब भरतात.
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.
पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठराविक प्रदेशांतच पडतो.पाऊस पडतो तिथे समृद्धता असते.पाऊस ह्या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत .
पाऊस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.