जोरहाट

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जोरहाट

जोरहाट (आसामी: যোৰহাট) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जोरहाट शहर आसामच्या पूर्व भागात गुवाहाटीच्या ३०० किमी पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून ते पूर्व आसामधील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. जोरहाट आहोम साम्राज्याचे अखेरचे राजधानीचे शहर होते. २०११ साली येथील लोकसंख्या १.२६ लाख इतकी होती.

येथून उत्तरेला ब्रह्मपुत्रा नदीमधील माजुली हे नदीपात्रात असलेले जगतील सर्वात मोठे बेट आहे.

जोरहाट टाउन रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या तिनसुकिया विभागाच्या अखत्यारीत येते. जोरहाट विमानतळ जोरहाट शहरापासून ७ किमी अंतरावर स्थित असून येथून बंगळूर, गुवाहाटी व कोलकाता ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.

आसाम कृषी विद्यापीठाचे आवार जोरहाटमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →