दिमापूर रेल्वे स्थानक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दिमापूर रेल्वे स्थानक

दिमापूर रेल्वे स्थानक हे भारताच्या नागालॅंड राज्याच्या दिमापूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे नागालॅंड राज्यातील एकमेव रेल्वे स्थानक असून गुवाहाटीकडून दिब्रुगढकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात.

१९०३ साली बांधले गेलेले दिमापूर स्थानक ब्रिटिशकालीन आसाम बंगाल रेल्वेच्या चित्तगॉंग-दिब्रुगढ ह्या मीटर गेज मार्गवरील एक स्थानक होते. १९९७ साली ह्या स्थानकाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले गेले. आजच्या घडीला दिमापूर हा नागालॅंड व मणिपूरला भारतीय रेल्वेद्वारे जोडणारा एकमेव दुवा आहे. येथून दर आठवड्याला ४९ गाड्या सुटतात. १२३ किमी लांबीच्या दिमापूर-कोहिमा रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भारत सरकारने कार्यक्रम आखला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →