न्यू जलपाईगुडी जंक्शन रेल्वे स्थानक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

न्यू जलपाईगुडी जंक्शन रेल्वे स्थानक

न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाइगुडी जिल्ह्याच्या जलपाइगुडी व सिलिगुडी ह्या जुळ्या शहरांमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारताचे प्रवेश्द्वार समजले जाणारे न्यू जलपाईगुडी स्थानक भारतातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पश्चिम बंगालमधून आसामसह ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या न्यू जलपाईगुडीमार्गेच जातात.

इ.स. १९४७ मधील भारताच्या फाळणीनंतर बंगाल व आसाम भागांमधील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. ह्यामुळे सिलिगुडीचे रेल्वे जंक्शन म्हणून महत्त्व वाढीस लागले. १९६० साली भारतीय रेल्वेने अनेक नॅरोगेज व मीटर गेज मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली व सिलिगुडीच्या दक्षिणेस नवे स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला. १९६१ साली उघडले गेलेले न्यू जलपाईगुडी स्थानक लवकरच उत्तर बंगालमधील सर्वात वर्दळीचे स्थानक बनले. दार्जीलिंग ह्या लोकप्रिय पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी न्यू जलपाईगुडी येथून दार्जीलिंग हिमालयन रेल्वे सुटते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →