परशुराम कुंड (अरुणाचल प्रदेश)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

परशुराम कुंड (अरुणाचल प्रदेश)

परशुराम कुंड हे अरुणाचल प्रदेशातील एक तीर्थक्षेत्र आहे. परशुराम कुंडाच्या जवळच परशुरामाचे एक मंदिर आहे. लोहित नदीच्या काठावर हे कुंड आहे. ह्या कुंडाचे आणि मंदिराचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तजन येथे येतात. मंदिरात परशुरामाची शुभ्र संगमरवरी दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. कुंडामध्ये स्नान करण्याची सोय आहे. परशुरामाच्या मंदिरापासून ते कुंडापर्यंतचा डांबरी रस्ता २००४ साली पूर्ण झाला. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी यात्रेकरूंची राहण्याची व्यवस्था आहे. परशुराम कुंडाला ‘ब्रह्मकुंड’ असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →